मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
अष्टक १

पदसंग्रह - अष्टक १

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


[वसंततिलक वृत्त. गण त, भ, ज, ज, ग.]
जाणोनि तत्व मग जाणिव भावना ही ॥ स्वानंदतृप्त सकलाशयमुक्त पाही ॥
राहो अथवा तनु पडो समता मनाला ॥ अद्वैतबोधपदनिश्वय पूर्ण झाला ॥१॥
ज्ञानानलें विविध संचित दग्ध झालें ॥ वंध्याइव्लासवत्सत्क्रियमाण केलें ॥
प्रारब्धशेष उरलें जननिश्वयाला ॥ अद्वैत० ॥२॥
कोणी उदास वनवासविहार खेळे ॥ कोणी स्वकर्मरत आश्रमधर्ममेळे ॥
स्वच्छदता रमत एक विकल्प गेला ॥ अद्वैत० ॥३॥
रक्षूं प्रजा मदगजारुढ राजभद्री ॥ भिक्षू उदासीन अकिंचन हो दरिद्री ॥
संकल्पशन्य मन आग्रहभाव ठेला ॥ अद्वैत० ॥४॥
स्वप्नेंद्रजालवत्‌ मायिक सर्व आहे ॥ यालागिं निश्वळ मनें भय कोण वाहे ॥
स्वप्रत्ययें विविध-भाव अभाव ठेला अद्वैत० ॥५॥
सिंधूसि सिंधूसम भास्कर भास्करातें ॥ याहूनि चोज उपमा न दिसे तयातें ॥
वर्णील कोण गुणवर्जित निर्गुणाला ॥ अद्वैत० ॥६॥
जीवेश्वरा अणि जगाप्रति एक काळें ॥ निर्धारिलें घट मठीं नम जेंवि खेळे ॥
वेदांत संत निज संमत याचि बोला ॥ अद्वैत० ॥७॥
तो चिद्विलास मुनिमानसहंस जाणा ॥ विश्वों वसे परि निरंकुश गम्य कोणा ॥
रंगूनि निश्वय निजानुभवीं विराला ॥ अद्वैत० ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP