श्री आकाशी येताची गगनी कृष्ण उठोनी जेऊ मागे चक्रपाणी बोले जननी आता पाण्याहूनी येते कान्हा मग जेव सजना नको पाण्याला जाऊ आई मला मोठी घाई कृष्णा जेवायाची घाई अजूनी वेळा नाही झाली हरी करुनी मात करी देत गालावरी रागा भरला चक्रपाणी गेला उधळूनी पेटी लल्लाटी टाकुनी यशोदा शोक फार करी हरी जेवण्या मागूनी बाहेरी गेला नाही जेवू घातीला याला सांगे नंदाल नंद धुंडिला सेजबाजा नाही दिसे यदुराजा आता चढूनी भींतीवरी खेळे उपरी आणा धुंडुनी चक्रपाणी पेढे शरेनी आता पाहावा कोण्या वाटा गवळ्याच्या पेठा आतां पाहावा कोण्या तिरी गवळ्याच्या घरी कृष्ण राधेच्या सेजावरी राधेच्या भर्तार चतुर बोलविला परमानंद करी आनंदनंद यशोदा उभे दारी लहान मूर्ति घेऊनी कडेवरी आली बाहेरी सांभाळा माताजी आपाला हरी हर्षभरी झाली माता उतरी लिंबलोण भूकेला तान्हा माता करीती चारी भुजा भूकेला राजा साखर बर्फी घे बा मातेपासी पेढे बत्तासे आणीक घेशील बा रेवड्या माग श्रीखंड वड्या येळीया दळीयाची बर्फी फार खवा सुंदर-आंबे, नारींग ,जांब फळ देते सोनकेळ द्राक्षा , डाळींब सीताफळ घेऊनी केळ आणि घेशील वा पुरणपोळी त्याच्यावर साटोरी वडा कुरडई पापड पुरी-सेवाई खिरी खिरी येरविळ्या थोफळवारी दूधा साखरी रस आंब्याचा भरली वाटी जेवी जगजेठी भरुनी साखर लोणी सांबार आहे कढी जेवी ताताडी झाले कृष्णाचे पांच पक्वान्न यशोदा माताजीचे समाधान विडा घेऊनी हात जोडोनी.