रामनाम मोत्यावाणी घे मना हिरे उचलोनी ॥धृ॥
जन्मोजन्मी पातक केले सहज गेले निवळुनी ॥१॥
रामनामाने होईल काही शुभ्रही मोत्यावाणी ॥२॥
रामानामाने प्रल्हाद तरले वाल्मिकासी बोध झाला कितीक गेले उद्धरोनी ॥३॥
तुकारामाने संसार केला देह असताना वैकुंठी गेला - रामनामाच्या प्रतापानी ॥४॥