पायी खडावा चुट चुट वाजे । कानी कुंडल लुट लुट हाले । कटी पितांबर कसला । दत्त हा औदुंबरी बसला । चला जाऊ दर्शनाला दत्त हा औदुंबरी बसला ॥१॥
गंगेचे पाणी गड्या भरुनी । सत्वर येणे घाटा वरुनी । प्रभुसी घालु प्रेम आंघोळी ॥२॥
वैशाख मासी वसंत ऋतुसी पुष्प आणिले देव पुजेसी । गंध लेपन करुनी त्याला ॥३॥
ध्रुप दीप नैवद्य लावूनी विडा देऊ त्याला ॥४॥
दास म्हणे हो सदगुरु राया शरण जाऊ त्याला ॥५॥