श्री गुरुदत्ता जय भगवंता । ते मन निष्ठुर तु करी आता ॥धृ॥
चोरे द्विजासी मारिता मन जे । कळवळले ते कळवळलो आता ॥१॥
पोटे शुलाने द्विज तडफडता । कळवळले ते कळवळलो आता ॥२॥
द्विज सुत मरता वळले ते मन । हो कि उदासीन न वेळो आता ॥३॥
सती पति मरता काकुळती येती । वळले ते मन न मन चळो की आता ॥४॥
श्री गुरुदत्ता त्यज निष्ठुरता । कोमल चित्त वळवी आता ॥५॥