बसले होते आनंदात आले आले कौरवदूत धरली वेणी अकस्मात नेली रे नेली दुर्जनात यादव राया भैया यावे सोडवाया ॥धृ॥
मौन धरीली धर्माने शांती धरीली अर्जुनाने भीम खाली मान नकुल सहदेव झाले लीन यादवराया ॥१॥
रंभेपासी उभागज तैसा वैरी भासतो मज गेली रे गेली माझी लाज यादवराया ॥२॥
द्रौपदीने धावा केला निजला कृष्ण जागा झाला उठूनी कृष्ण सभेसी आला यादवराया ॥३॥
कृष्णा यावे सावधान कोण राखील तुझा मान गेला रे गेला माझा प्राण ॥४॥
धावूनी आले जगजीवन नेसवी आपुला पितांबर वर धरी सुदर्शन यादव राया ॥५॥