हृदयी ठेविला चिंतामणी चिंता गेली हो रानोरानी ॥धृ॥
मज वाटत नाही भय भगवंत लाविली सर्व सोय, सारखी मजला लाभहानी जन्मोजन्मी सांभाळीले जन्मासी, त्यानी हो घातीले त्याचे नाव आळवा वानी ॥१॥
दररोज सत्संगासी जावे, कथा पुराण ऎकावे साह्य होईल चक्रपाणी ॥२॥
रुक्मींणीस झाला दृढ विश्वास , हरी चुकवील यम फास धावूनी येईल मोक्षदानी ॥३॥