भाव भुकेला हरी करीतसे भक्तांची चाकरी ॥धृ॥
भेटी आला भक्त सुदामा भुलला त्याच्या भक्ती प्रेम दैन्य तयाशी हरी ॥१॥
त्रैलोक्याचा धनी श्रीपती सुखी होऊनी पार्थ सारथी , श्रम पांडव घरी ॥२॥
भक्त कविरा कृष्ण कृपाळू विणु लागला शेले शालु , बसुनी मागावरी ॥३॥
आंगण झाडी जाते ओढी संत जनीच्या घरी कावडी, रांजणात भरी करीतसे भक्तांची चाकरी ॥४॥