आई आली भवानी स्वप्नात ॥धृ॥
सुरवीर दासू प्रसन्ना वदनी जैसी वीज चमके गगनात ॥१॥
सरळ भांग टिळा भुजंग वेणी काजळ ल्याली नयनात ॥२॥
रत्नजडित हार पीत पितांबर कंचुकी शोभे अंगात ॥३॥
कंकण कनकाचे कणकणती वाजती पैंजण पायात ॥४॥
केशर कस्तुरी मिश्रित तांबुल लाल रंगला वदनात ॥५॥
विष्णुदास म्हणे अशीच निरंतर दे आवडी भजनात ॥६॥
आई आली भवानी स्वप्नात ॥