श्री गुरुदत्तराज मूर्ती ओवाळीते प्रेमे आरती ॥धृ॥
ब्रह्म विष्णू शंकराचा असे अवतार , श्री गुरुचा , कराया उद्धार जगाचा जाहला बाळ अत्रीऋषीचा , धरीला वेष असे यतीचा मस्तकी मुगुट शोभे जरीचा , कंठी रुद्राक्ष माळ धरणी, हातामधे आयुधे धरणी , तेथे भक्तांची क्लेश हरणी, त्यासी करु नमन होय अति शमन , होय रिपुदमन गमन असे त्रिलोक्यावरती ॥१॥
गाणगापुरी वस्ती ज्याची आवड औदुंबर छायेची आवड अमर ज्या संगमाची भक्ती असेल त्रिशुळाची वाटा दावूनी योगाची ठावही देत असे निज मुक्तीची कशी क्षेत्र स्नान करितो कारवीर भिक्षेला जातो माहुरी निद्रेला येतो चाल तरतरीत छाती दरदरीत नेत्र गरगरित शोभे खरखरीत त्रिशुल हाती ॥२॥
अवधुत स्वामी सुखानंद ओवाळीते सौख्यकंदा तारी हा दास रजक कंदा आले शरण अत्रानंद सोडवी विषय मोहधंदा दावी सतगुरु ब्रह्मानंदा चुकवी चौर्यासीचा फेरा घालीती षडरीपू मज घेरा घालिती पुत्र पौत्र द्वारा वदवी मुखी भजन करवीसी पूजन करविसी कृपा करी बळवंतावरती ॥३॥