कमलनयन भुजंग शयन बंधू राज या । अंध पुत्र गांजी फार रुक्मिणी प्रिया ॥धृ॥
वस्त्रर हित करु पाहसी आजी या मला । निरा धारी झाले म्हणूनी ध्यासले तुला । केस धरुनी सभेसी मला ओढी फरफरा । कंठ माझा तुझ्या चरणी दर्शनासी फुटला ॥१॥
दु:ख देवा बहुत जीवा देते दुरमती । आस धरुनी वाट तुझी पाहू मी किती । निरु पदेश उमलती खूंटली मती ॥२॥
कुठे गुंतलासी हरी सौख्य मंदीरी मृग, मध केशर कस्तुरी बुक्का लावो परोपरी ॥ त्यागूनी आता येशील केव्हां भगिनी मंदीरी ॥३॥
पांचालीसी प्रेम ध्यान लावूनी मानसी । ब्रिद सोडूनी जरी तू आता अंत पाहसी पित वरुनी पाहू
निया झाले निर्भया ॥४॥