दत्त दर्शनासी चला लाभ जाहला ॥धृ॥ वाटे गावी पुण्यक्षेत्री बसले नरहरी संगे घेऊनी कृष्णामाई संगे माऊली ॥१॥
औदुबंरी आसन घालुनी बैसे सावळा, गळा रुद्राक्षाच्या माळा जटा ही पिवळ्या ॥२॥
मोठे मोठे लोक येऊनी पूजनही करिती धूप , दीप करुनि या नैवद्य अर्पिती ॥३॥
शरण आली गंगामाई नमुनी घ्या तिजला अनुसयाच्या उदरी दत्ताचा जन्म झाला ॥४॥