नित्य मनी जपा राम करी कल्याण मंगल धाम , नित्य मनी जपा राम राम ॥धृ॥
वाल्या कोळीयाचा वाल्मिकी झाला , वंद्य होवोनी जगीया ठेला ॥१॥
प्याले शंकर विष हळहळ . शांत झाली तयाने तळमळ ॥२॥
नाम मंत्र मंत्र बाहुभारे काय सांगु तयाची मी थोरी ॥३॥
पांडुरंग रंगला रामनामी , कृपा केली श्री दत्तगुरुनी ॥ नित्य.॥४॥