अंगणी माझ्या कोण बोले कोकीळ बोले मधुरवनी ॥
शुभ शकुन सांगा कोणीतरी कधी भेटेल मजला देव हरी
भेटेल मजला कृष्ण हरी ॥धृ॥
लवतो माझा डावाची डोळा तळमळ जीव करी ॥२॥
हस्तीगे माझ्या ग्रस्ती पडीला बाई गे माझी सुमर करी ॥३॥
श्रीकृष्ण बंधु द्रोपदी बहिण त्यांची सेवा मीच करी ॥४॥
पद्मनेन प्रभु हरी परमेश्वर गुरु चरणावरी चित्त धरी ॥५॥