अवतारामध्ये पराक्रमी अमुचा देव नरहरी निघाली खांबातुन स्वारी निघाली खांबातुन स्वारी ॥धृ॥
कडकड कडकड कडाड झाला दैत्याला मारी हरी हा दैत्याला मारी-नखाग्रहाने फाडुनी त्याचे आतडे काढी ॥१॥
सकल देवांनी स्तवन मांडीले ब्रह्म हात जोडी हरीसी ब्रह्म हात जोडी शांत कराया रमा धावली नेसुनीया साडी ॥२॥
बाळ प्रल्हाद म्हणे हरीसी आवर आपुल्या कोपा हरी रे आवर आपुल्या कोपा बाळ प्रल्हाद स्तवन मांडीले शांत हो बाप्पा तेव्हा ते आदर सिंहरुपा ॥३॥
अवतारामध्ये पराक्रमी ।