पंढरीचा विठ्ठल राज आज मी पाहिला रत्नजडित सिंहासनी रत्नखचित विटेवरी उभा गे राहिला पंढरीचा विठ्ठलराज आज मी पाहिला ॥धृ॥
पुंडलिकासाठी अवतार घेतला राई रखुमाबाई दोन्ही बाजुला । तुळशीचे हार गळा पदक कंठीला ॥१॥
एकनाथ घरी पाणी वाहिले फुका जनी संगे दळू लागे आवडी सखा । जनी संगे ओव्या गाता नाही गे शिणला ॥२॥
कबिराच्या घरी शेले विणवु लागला चोखा मेळ्यासंगे ढोरे ओढू लागला दामाजीची रशीद घेता नाही गे शिणला ॥३॥
सांवळ्याची भाजी खुडूनी भारा बांधिला मीराबाई संगे पेला विषाचा घेतला तुकोबाच्या भेटीसाठीं वचनी गुंतला । पंढरीचा विठ्ठलराज आज मी पाहिला ॥४॥