चित्ती जो ठसला मजला ठेवा सापडला ॥धृ॥
गुरुकृपेची छाया मजवरी सुखवी सुखाला आत्मपदाच्या शिखरी बैसोनी जिकुंनी शत्रुला ॥१॥
जवळी आले ज्ञानचक्षू दिव्य प्रकाश झाला पाहु जाला जैसा न तैसा कदा न तो ढळला ॥२॥
काळा गोरा रंग असेना जवळी ना दुरीला, दैत्यावाचूनी निष्काळ राहे एकाएकी रमला ॥३॥
जो नाही तो तोची आहे गगना सम दिसला कोकीळ रंग तोची होऊनी तनु भाग मुकला ॥ मजला ठेवा सापडला ॥४॥