जय करुणा घन निज जीवन । अनुसया नंदन पाही जनार्दन ॥धृ॥
निज अपराधे उरफाटी दृष्टि । होऊनि पोटी भय धरु पावन ॥१॥
तु करुणाकार काही आम्हावर रुससी न किंकर वरद कृपाधन ॥२॥
वारी अपराध तु मायबाप । तव मनी कोपले शनि वामन ॥३॥
बालक अपराध गणे जरी माता । तरी कोण माता देईल जीवन ॥४॥
पार्थी वासुदेव पदी ठेवी भाव । पदी ठेवो ठाण देवा अभिनंदन ॥५॥