जनाबाईनी सोडुनी सारे ध्यान तुझ्या चरणात रमविले-हरिनामाची अंखड गोडी थोडी देशील का । दर्शन देशील का विठ्ठला ऽऽ दर्शन देशील का ॥धृ॥
असेल कोठे जरी लपलेला कोण? कुठे मी पाहू तुजला भक्तांचा तु पाठीराखा धावा देशील का ॥१॥
चंद्रभागे वाळवंटी भजनी रमली संत मंडळी आषाढी कार्तिकी एकाद्शीशी तुझ्या चरणावर पडली मिठी त्या चरणाचे दर्शन मजला होईल का ॥२॥
संत सखूवर जनाबाईवर अखंड प्रेम कसे द्रौपदीवर तुझ्या चरणाची होईन दासी धावा घेशील का विठ्ठला मुक्ती देशील का ॥३॥