गुरुराज माझे आई मज पैलतिरा नेई ॥धृ॥
संसार सागर मोठा, परमार्ग फुटेना फाटा । मग जाय आडमार्गी वाटा याशी विचार करु तरी काय ॥१॥
काम क्रोध मगरांनी सुसरींनी । अज्ञान होई बुडविती गुरुराज हात मज देई ॥२॥
देहे नावोमध्ये बैसोनी । ज्ञान दीप सवे लावूनी वरद हस्त ठेवी मज शिरी ॥३॥
दीनदासी रुक्मिणीसी । द्यावा ठाय चरणापाशी । रामनामाची सांगड देई ॥४॥