जनाबाईनी सोडूनी सारे ध्यान तुझ्या चरणात रमविले हरिनामाची अखंड गोडी थोडी देशील का दर्शन देशील का विठ्ठला दर्शन देशील का विठ्ठला ॥१॥
असेल कोठे जरी लपलेला कोण कुठे मी शोधु तुजला भक्तांचा तु पाठीराखा धावा घेशील का ॥२॥
चंद्रभागे वाळवंटी भजनी रमली संत मंडळी आषाढी कार्तिकी एकादशीसी तुझ्या चरणावर पडली मिठी त्या चरणाचे दर्शन मजला होईल का ॥३॥
संत सखुचे जनाबाईवर अखंड प्रेम कसे द्रौपदीवर तुझ्या चरणाची होईन दासी धावा घेशील का मुक्ती देशील का विठ्ठला ॥ दर्शन ॥४॥