गणपति भेटि तुम्ही द्या हो मला तुम्हांवाचुनी जीव माझा व्याकुळ झाला ॥धृ॥
सर्वांहुनी आससी महान सर्वांची तुजला देती मान बोलविता मंगल कार्याला ॥१॥
रिद्धी सिद्धी तुम्हां हाती मज मूढा द्यावी मति,वंदन मी केले तुमच्या पायाला ॥२॥
तुम्हां वाहु दूर्वा जोडी मोदक लाडू ठेवीं पुढीं , भक्तिने मी नैवेद्य अर्पण केला ॥३॥
गणपतीने कृपा केली विघ्ने सारी नष्ट झाली, रुक्मिणीच्या हॄदयी मंगल झाला ॥४॥