ब्रह्म सनातन सगुण रुपाने दशरथसुत प्रभु अवतरला जाऊ चला गे सकल मिळोनी श्री रघुवर तो पाहण्याला ॥धृ॥
चैत्र शुद्ध शुभ दिन उगवला राम नवमी म्हणती त्याला , मध्यान्हला रवी हा येता पुत्ररत्न कौसल्येला ॥१॥
वाद्ये वाजती तोफ उडती वाटती शर्कराजनतेला , मोद भराने नारी नर ते येती श्रीमुख पाहाण्याला ॥२॥
जग नियंता रघुकुल भुषण बालरुप घेऊनी आला , माया मोहे व्यापुनी सकला दाखवी अघटित ही लीला ॥३॥
अनामाद्वथ अरुप असोनी नामकर्ण विधी जो केला, रामचंद्र हे नाव ठेवुनी देती झोका हो त्याला ॥४॥
सुख दु:खाचे झोके देवुनी हा जीवाला हा बहु श्रमला, जो जो जो जो जोजो बाळा निद्रा करी रे सुकुमारा ॥५॥
ब्रह्मा सनातन सगुन रुपाने दशरथा सुत प्रभु ॥