कंचुकीचा छंद बाई लागला मला , मम इच्छा पूर्ण होई म्हणुनी गेले शोधेला , भावजींनी एकटे ठेवले मला स्वामी निघुनी गेले मृगेच्या शोधेला, सोडी सोडी आता रावणा मला येईल वामा करील युद्ध ताडीने तुला ॥१॥
कपटी बाई तोची हाका मारु लागला , भीक्षा घाली सत्वरी जाऊ दे मला रेषा ओढुनी दिली शपथ रे तुला ॥२॥
उचलुनी खांद्यावरी नेली लंकेला अशोकवनी नेऊनी सीता ठेवली , वनी धावेल का कुणी आता मम हाकेला ॥३॥