अंबे जगाची तू माता तुज नमस्कार आता ॥धृ॥
आदिमाता तु आदिशक्ति लक्ष्मी सावित्री तु पार्वती , शेषी शिणला गुण गाता ॥१॥
चौर्यांशी फिरता श्रमले बाई म्हणूनी आले तुझ्या पायी म्हणुनी आले तुझ्यापायी अभय दान तू मजला देई मिटवी प्रपंचाच्या व्यथा ॥२॥
दीनावरती दया केली काया माझी शीतल झाली दंग झाले तुला पाहता ॥३॥
काम, क्रोध, लोभ, मोह सारे गेले चरणी तुझ्या तल्लीन झाले रुक्मिणी चरणी ठेवी चरणी ठेवी माथा तुज नमस्कार आता ॥४॥