कुठे रे शोधू विठ्ठला कोठे रे पाहूं तूला । भावाच्या भुकेला का रे घरासी नाही आला कठिण केले मन भक्तांत भूषण । तुझ्यासाठी देईन प्राण । माता-पिता , बहिण , बंधु , तुच माझा सखा विठोबा तुच माझा सखा । स्नेहाने प्रेमाने किती रे मारु हाका पति-पुत्र ,मित्र - सोयरे सजन आला तु माझा । तुझ्या संगाने बहु रंगाने कीर्ती लागल्या ध्वजा । पाप-पुण्य समान दोन्हीं अर्पण केली तुला विठोबा अर्पण केले तुला । संसारासी झाले उदासी मांडीले उपासी जमाखर्च काही नाही विठोबा । हिशोब झाला संशय गेला शून्य पडली वही । आतां मागणे नाहीं विठोबा आता मागणे नाही । झालो मी नरदेही । काशीनाथ म्हणे रिता मी भीत नाही कोणाला । भजन पूजन स्मरण करितो वेळीच्या वेळा कोठे रे पाहूं विठोबा तुला कोठे रे शोधू तुला ।