मज दुबळी वरी करी कृपा दया सागर । काय भाग्य आले उदयासी गुरु आले घर ॥ पाप प्रक्षावूनी नमिते मी हरहरा । दिन सोन्याचा उगवला सुजन दसरा ॥ श्री मुखाने अवलोकिते पुढे पुढे सरुन नेत्र झाळुनी आठविते चित्ती मनी धरुन । ह्या पाटावरती बसविते गुरु हात धरुन । संसारी ताप तापलो । पाजिते मी पेला देशाचा की गुरु माझ्या घरी पाहुणा आला ॥१॥
उष्ण उदक पाणी तापवुनी घंगाळी विसाविते । अत्तर हार गजरे फुले उटणे मी केले । शांती चौरंगी बसवूनी स्नान घातिले । गुरु तनूशी बाई पदराने मी पुसिले । नेसविला पितांबर शांतीचा बहु भारी । अनुभवे ओढिली शाल श्रीहरी । या आसनावर बसविले जगाचे तारी । झारी भरुनी सत्व बोधाची ठेवी बाजूला ॥२॥
केशरी भावे तिलक लावूनी अंगूठी । हार गजर्यावरी फेकिते बुक्क्याच्या मुठी । नवनिधि भाव पक्वान्ने वाढिते मी चोखा । तुम्ही दया करुनी हात ठेवा माझ्या मस्तका ॥ श्री शुका गुरु महाराज पावे दासाला ॥३॥