मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|पुरंदरायण|
पुरंदरायण

पुरंदरायण - पुरंदरायण

कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..


माय मराठीचे हे भूषण
त्या दासांचे हे पुरंदरायण ॥ध्रृ॥
मराठदेशी तो जन्म घेवून
कानडीमाजी रचिले कवन
धन्य माझी माय, मराठी पावन
कानडीस दिधला पुत्र महान
त्या दासांचे हे पुरंदरायण ॥१॥
साधुसंता भाषा एकसमान
कानडी मराठी भक्तिमिलन
अवघ्यांना प्रिय विठ्ठल जाण
दास दृढ धरी, तयाचे चरण
त्या दासांचे हे पुरंदरायण ॥२॥
हरिकथा, कीर्तन, प्रवचन
सूर, ताल, लय, गान निपुण
केला परमार्थ, संसारी राहून
धरी एक आस जनकल्याण
त्या दासांचे हे पुरंदरायण
धन्य ते दास पुरंदरदास
विठ्ठल विठ्ठल घेतला ध्यास
हरिनामामृत विनासायास
सांगती, मुक्तीचे तेच साधन
त्या दासांचे हे पुरंदरायण
=========

समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : February 04, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP