पुरंदरायण - काय ते राहिले
कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..
मायेचा संसार
मी पण मिटले
काय ते राहिले ॥१॥
मनास भावले
भूमीगत झाल्यावर
काय ते राहिले ॥२॥
करिता गणपती
वानर झाल्यावर
काय ते राहिले ॥३॥
आधाराचा खांब
आला अंगावर
काय ते राहिले ॥४॥
भरवसा ज्यांच्यावर
सोडूनिया गेल्यावर
काय ते राहिले ॥५॥
खणता विहीर
वेताळ बाहेर
काय ते राहिले ॥६॥
जन जनार्दन
वैरी झाल्यावर
काय ते राहिले ॥७॥
चार चौघामाजी
मान गेल्यावर
काय ते राहिले ॥८॥
प्राणसखा मित्र
शत्रू झाल्यावर
काय ते राहिले ॥९॥
गंध संसाराचा
उडुनिया जाता
काय ते राहिले ॥१०॥
पुत्र, भार्या, बंधू
वैरी झाल्यावर
काय ते राहिले ॥११॥
कोणती ती आस
नाश झाल्यावर
काय ते राहिले ॥१२॥
तूच म्हणविसी
देवा दयाघना
काय ते राहिले ॥१३॥
पुरंदर विठ्ठला
दावी पैलतीर
काय ते राहिले ॥१४॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2023
TOP