पुरंदरायण - सोवळे
कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..
सोवळे सोवळे म्हणुनी माणसा उडतोस तू तर तीन ताडा
तूची सोवळा तूची ओवळा सोवळे कुठले मुर्दाडा ॥ध्रृ॥
चर्म हाडके मलमुत्रातून न्हावुन निघसी मुर्दाडा
नवद्वारातुनी घाण वाहते ऐक जरा रे मुर्दाडा
सोवळे सोवळे म्हणुनी..... ॥१॥
जन्म सूतक मरण ही सूतक सोवळे कुठले मुर्दाडा
तीर्थामाजी बुडी मारुनी कैसा पावन मुर्दाडा
सोवळे सोवळे म्हणुनी..... ॥२॥
चर्म धुवूनी कर्म जाई का? मर्म जाणुनी घे मुर्दाडा
स्मरण करीत जा पुरंदर विठ्ठल निर्मल होशील मुर्दाडा
सोवळे सोवळे म्हणुनी..... ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2023
TOP