पुरंदरायण - मना रे
कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..
मना सोडूनी तू विषयविचार
मना प्रतिदिनी तू सत्कर्म कर
मना रे मानसी तू मंथन कर
मनी हरिचरणी ठेवी तू शीर ॥१॥
मना रे हरीकथा श्रवण कर
मना रे संतसज्जन संग धर
मना रे आता तू सोड दुराचार
मना जनहित कर निरंतर ॥२॥
मना हरिभक्तीची तू आस धर
मना पायी पायी तिर्थाटन कर
मना नको रे गर्व देह नश्वर
मना पुरंदर विठ्ठल आधार ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2023
TOP