पुरंदरायण - लटपट खटपट
कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..
लटपट खटपट का रे करिसी
अंती सोडूनिया तू झटपट जासी ॥ध्रृ॥
आलासी नंगा तू नंगाची जाशील
देवाला पण तुझी धास्ती वाटेल
कवडी कवडी माया वाया जाईल
देह नाशवंत, कुणाचा भार वहासी
लटपट खटपट का रे करिसी
अंती सोडूनिया तू झटपट जासी ॥१॥
बांधुनिया तू मोठा महाल इमला
जीव नानाविध भोगामाजी गुंतला
माझे माझे म्हणूनिया जीव धावला
वेड्या, अंती चार खांद्यावरुनी जासी
लटपट खटपट का रे करिसी
अंती सोडूनिया तू झटपट जासी ॥२॥
वय वाढेल तुझे सरेल बळ
अवघाची संसार, मायेचा खेळ
यम तो येईल, नाही काळ वेळ
पुरंदर विठ्ठल का रे विसरसी
लटपट खटपट का रे करिसी
अंती सोडूनिया तू झटपट जासी ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2023
TOP