पुरंदरायण - प्रपंच हा आकलेना
कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..
प्रपंच हा आकलेना
त्याचे वर्म उमजेना ॥धृ०॥
मन सावध होईना
भ्रम मनीचा जाईना
चित्त स्थिर ही राहीना
किती सांगाव्या यातना
प्रपंच हा आकलेना
त्याचे वर्म उमजेना ॥१॥
वय वाढ थांबेचिना
तयातही व्याधी नाना
अन्न जल ही रुचेचिना
वैद्य कोणीही गवसेना
प्रपंच हा आकलेना
त्याचे वर्म उमजेना ॥२॥
योग काही दिसेचिना
भोग काय कळेचिना
वैद्य तुम्ही नारायणा
श्रीपुरंदर विठ्ठल दयाघना
प्रपंच हा आकलेना
त्याचे वर्म उमजेना ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2023
TOP