पुरंदरायण - नाही वस्तू आपुली
कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..
नाही वस्तू आपुली, कोठे असोनी व्यर्थ
नाही मनास भावली, तरुणी भुलोनी व्यर्थ ॥धृ०॥
आदराविण सुग्रास भोजन ते व्यर्थ
दुष्ट वाचाळ सतिसुत ही व्यर्थ
लाविती कलागती, ऐसे सहोदर व्यर्थ
मृत्यु न टाळी, ती औषधी व्यर्थ
नाही वस्तू आपुली ..... ॥१॥
पापी दुराचारी, दीर्घायुषी पती व्यर्थ
सर्पमस्तकी धनसंपदा असूनी व्यर्थ
दिले सन्मानाविण, ऐसे धन ही व्यर्थ
पुरंदर विठ्ठल विसरला, तो संन्यासी व्यर्थ
नाही वस्तू आपुली ...... ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2023
TOP