पुरंदरायण - गुरुकृपा
कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..
धन्य धन्य ती गुरुकृपा मुक्तिचे तेच साधन ॥ध्रृ॥
धन्य धन्य ती गुरुकृपा मुक्तिचे तेच साधन
काळ कारे दवडसी, परि परी शास्त्र वाचून
उपनिषद्, गीतासार, हरिकथा प्रवचन
पांडित्य तुझे, जाईल व्यर्थ, सद्गुरुवाचून
धन्य धन्य ती गुरुकृपा मुक्तिचे तेच साधन ॥१॥
तुळशी माळ घालून गळा जपतप करुन
व्रत नियम, अनुष्ठान, देहकष्टतीर्थाटन
कोण देईल मुक्ति तुज सद्गुरुकृपेविण
योगी तो श्री पुरंदर विठ्ठल, दूजा दाता कोण ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2023
TOP