पुरंदरायण - मी कैसा अपराधी
कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..
मी कैसा अपराधी, सांग तू मुरारी
कपटी नाटकी तूच सूत्रधारी ॥धृ०॥
आम्ही पामर, कळसूत्री खेळणी
सूत्र देवा तूच हाती धरुनी
मायाजली तू आम्हा गुंतवूनी
का रे खेळविसी आम्हा परोपरी
मी कैसा अपराधी, सांग तू मुरारी
कपटी नाटकी तूच सूत्रधारी ॥१॥
असार संसार एक बंदिशाळा
अंतरी हा जीव बंदीवान झाला
द्वारी तुझा उभा रक्षक राहीला
का निष्ठुर झालास तू गिरीधारी
मी कैसा अपराधी, सांग तू मुरारी
कपटी नाटकी तूच सूत्रधारी ॥२॥
कारागृही आलो तूच रे कारण
कैसे देवा व्हावे मुक्त मी यातून
अनाथांच्या नाथा तवपदी शरण
पुरंदर विठ्ठला आता मज तारी
मी कैसा अपराधी, सांग तू मुरारी
कपटी नाटकी तूच सूत्रधारी ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2023
TOP