पुरंदरायण - जीव एक बंदी देह बंदीशाळा
कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..
जीव एक बंदी, देह बंदिशाळा ॥ध्रृ॥
जीव एक बंदी, देह बंदीशाळा
भवसागरी या रंजला गांजला
यम येवोनिया ओढताना तुजला
कोण सोडवील सांग जीवा मजला
जीव एक बंदी.... ॥१॥
थांब एक गोष्ट सांगतो तुजला
आप्तबंधू जैसा गुळासी डोंगळा
यमदूत येता गूळ कडू झाला
आप्तबंधू तुझा कुठे रे दडला
जीव एक बंदी.... ॥२॥
सुंदर भार्या धनसंपदा इमला
गर्वाने हा जीव उतला मातला
नश्वर हा जीव उगाच भुलला
कुठे रक्षक ? यम घेवोनिया गेला
जीव एक बंदी.... ॥३॥
सुखाचा सोबती कोणी नाही आपुला
माझे माझे म्हणोनी उगाच गुंतला
घाणीमाजी जन्मोनी घाणीमाजी वाढला
रंजला गांजला अंती मातीत घातला
जीव एक बंदी.... ॥४॥
जीवा आता काय रे सांगू तुजला
यम तो येईल, नाही का दिसला
म्हणेल तो मग फसला रे फसला
वेगे शरण जा पुरंदर विठ्ठला
जीव एक बंदी.... ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2023
TOP