पुरंदरायण - भाग्य मिळाले
कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..
भाग्य मिळाले काय मागू आणिक
मार्गी हरवले, ते मिळाले माणिक ॥धृ०॥
ना ते सरते बाजारी ना मिळते
ना कोंदणी बसते ऐसे माणिक
भाग्य मिळाले काय मागू आणिक
मार्गी हरवले, ते मिळाले माणिक ॥१॥
कधी कुणाला देता घेता ना येते
कधी चोरी ना होते, ऐसे माणिक
भाग्य मिळाले काय मागू आणिक
मार्गी हरवले, ते मिळाले माणिक ॥२॥
अभागी रडतो, भाग्यवंताना मिळते
श्री पुरंदरविठ्ठल नाम दिव्य माणिक
भाग्य मिळाले काय मागू आणिक
मार्गी हरवले, ते मिळाले माणिक ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2023
TOP