वर्णू किती देवा, माझे अवगुण ॥ध्रृ॥
अन्नमद, अर्थमद, यौवनमद
ज्ञानमद, शौर्यमद, मीपण मद
उतलो मातलो, नाही भजन पूजन
वर्णू किती देवा, माझे अवगुण ॥१॥
भार्यापुत्र मोह जननी जनक मोह
राज्य, सत्ता मोह, शिशु पशु मोह
मोहात गुंतून, झालो किती हीन
वर्णू किती देवा, माझे अवगुण ॥२॥
मिळोनि ही आशा, अमर्याद आशा
कष्टजीवन आशा, नष्ट शरीर आशा
आशेला या नाही का, कोणतेच बंधन
वर्णू किती देवा, माझे अवगुण ॥३॥
अनंत अपराध, छळिती दारुण
गतजन्मीचे कर्म, असावे कारण
पुरंदर विठ्ठला, आलो मी शरण
वर्णू किती देवा, माझे अवगुण ॥४॥