पुरंदरायण - माझी अर्धांगिनी
कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..
माझी अर्धांगिनी, जीवनसंगिनी
मज गुरुस्थानी, जणु संजीवनी ॥ध्रृ॥
लोभ संपदेचा आणिक मृत्तिका
विन्मुख धाडीले, द्वारीच्या याचका
नाही दानधर्म, जोडीला मी पैका
वृत्ति माझी हीन, मन अभिमानी
माझी अर्धांगिनी....॥१॥
पालखीचा दांडा, दिला खांद्यावर
ऐसी अर्धांगिनी, केले उपकार
चित्त झाले शुध्द, गेला अहंकार
देवा आलो आज, नि:संग होऊनी
माझी अर्धांगिनी....॥२॥
तिच्याच कारणे हाती झोळी घेतली
आली माझ्या मागून होऊनी साऊली
ज्ञानाचा प्रकाश दाविते माऊली
केले मज पुरंदर विठ्ठल अभिमानी
माझी अर्धांगिनी....॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2023
TOP