पुरंदरायण - चारा वाहतो श्रीहरी
कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..
पांडवाघरी चारा वाहतो श्रीहरी
लक्ष्मीपती तो श्रीहरी, गर्व ना धरी ॥ध्रृ॥
अश्व तो धुतो, रथावर सारथी होतो
विदुराघरी कण्या, आवडीने खातो
सुदाम्याच्या पोह्यावर, तुटून पडतो
भक्ताच्या काजासाठी, धाव घेई मुरारी
पांडवाघरी चारा वाहतो श्रीहरी ..... ॥१॥
गवळ्यापघरी हरी, गाई गुरे राखतो
पांडवांच्या घरी हरी, गाई गुरे राखतो
पांडवांच्या घरी हरी, उष्टी काढितो
उष्टी बोरे शबरीची, प्रेमे चाखितो
भावभक्तिचा भुकेला, जाण तू हरी
पांडवाघरी चारा वाहतो श्रीहरी ..... ॥२॥
एकच बिंदू देता, सागर तो देतो
पुरे एक तुळशीपत्र, तृप्त तो होतो
नको धनसंपदा, हरी प्रेम मागतो
पुरंदर विठ्ठल नाम, हृदयी धरी
पांडवाघरी चारा वाहतो श्रीहरी ..... ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2023
TOP