पुरंदरायण - घरजावई
कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..
जिकडे तिकडे उठली आवई
झालासी रे म्हणे तू घरजावई ॥ध्रृ॥
नवे चार दिस गोड गोड बोलतील
सुगंधी जलाने तुज न्हावु घालतील
तुज सवे घेवून गोडधोड जेवतील
किती कौतुक ते भला तो माझा जावई
जिकडे तिकडे उठली आवई .....॥१॥
रंग नवलाईचे मग उडून जातील
तुज घालून पाडून बोलू लागतील
जावई हा झाला ऐदी सारे म्हणतील
आता जा रानात सवे तू घेवून गाई
जिकडे तिकडे उठली आवई .....॥२॥
आळशा नाही लाज, खावून माजलास
बायांची धुवूनी लुगडी, उष्टी भांडी घास
झाडुन गोठा आता बैस धूत म्हैस
ऐतखावू झाला किती हा जावई बाई
जिकडे तिकडे उठली आवई .....॥३॥
जावई नोहेच, झालासी घरगडी तू
तुझी बाईल करिते तुझीपण छी थू
व्यर्थ जन्म गेला, मिळविले काय तू
जा शरण तू पुरंदर विठ्ठल पायी
जिकडे तिकडे उठली आवई .....॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2023
TOP