पुरंदरायण - दासाची व्यथा
कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..
हाती धेवोनिया झोळी, फिरे दास दारोदारी
व्यथा उरी देवा, जाळिते का अंतरी ॥धृ०॥
बिकटवाट परमार्थ, संसारी राहून
प्रपंच माझा, भार्यापुत्र ते, येती मागून
दु:ख दाटते आत, नेत्र येती भरुन
नशिबी तयांच्या का, यातना या परोपरी
व्यथा एक उरी देवा, जाळिते का अंतरी ॥१॥
दास जेणे व्हावे, ते जग बोलणे सोसावे
अग्निमाजी राहून देवा, शीतल असावे
जनकल्याण कारणी, चंदन ते व्हावे
काय सुख ते लाभते, या दासाच्या संसारी
व्यथा एक उरी देवा, जाळिते का अंतरी ॥२॥
कर्ता करविता, तुझ्या चरणी ठेविले शीर
भार्यापुत्र ते माझे, सुखी ठेव निरंतर
माझे दु:ख मला ठेव, मज तार वा मार
पुरंदर विठ्ठला दास तुझा रे संसारी ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2023
TOP