पुरंदरायण - पसायदान
कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..
हात जोडुनी तुज मागतो देवा ॥
श्रीपती आम्हा हाची वर द्यावा ॥ध्रृ॥
ऋध्दी सिध्दी दाता, तू प्रथमेशा
तू सकलांची नुरवी, पुरवी आशा
चरणी तुझ्या शीर, वाहिले देवा
श्रीपती आम्हा हाची वर द्यावा ॥१॥
करुनी चित्त स्थीर, मन शुध्द कर
संतसंग घडू दे, देवा निरंतर
सकल जनासी सुखी कर देवा
श्रीपती आम्हा हाची वर द्यावा ॥२॥
प्रपंची जनासी लाभो धनसंपदा
पूर्ण करी मनोरथ, तयांचेच सदा
तयांची आपदा टळो मागणे हे देवा
श्रीपती आम्हा हाची वर द्यावा ॥३॥
आत्म-परीक्ष ज्ञानी गुरु मध्वमुनी
द्यावा आशीर्वाद, आम्ही लीन चरणी
दास विनवितो, पुरंदर विठ्ठल देवा
श्रीपती आम्हा हाची वर द्यावा ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2023
TOP