पुरंदरायण - हरीने दिधले
कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..
हरीने दिधले ते का रे दवडिले
ऐसा कैसा मूढ, झालासी मनुजा ॥ध्रृ॥
अपार ते धन मातीत गाडून
कोरडी भाकर खासी का रे मनुजा
धनसंपदा ती माती मोल होता
तुझ्या रे मुखी माती अंती मनुजा
ऐसा कैसा मूढ, झालासी मनुजा ॥१॥
घरी तुझ्या असता सुग्रास भोजन
भिक्षाच तू भक्षिसी, का मनुजा
तू ही ना खासी, ना दूजासी देशी
चोरांचे ते धन होईल मनुजा
ऐसा कैसा मूढ, झालासी मनुजा ॥२॥
नाही दानधर्म, नाही परहित
कवडीचुंबक, झालासी मनुजा
अंती नेण्या तुज येता यमदूत
पुरंदर विठ्ठल, वद रे मनुजा
ऐसा कैसा मूढ, झालासी मनुजा ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2023
TOP