मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|पुरंदरायण|
काय करु कृष्णा आता

पुरंदरायण - काय करु कृष्णा आता

कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..


काय करु कृष्णा आता व्यर्थची झाले जीवन
अनाथनाथा कमलाकांता आलो तवपदी शरण ॥धृ०॥
पूर्वजन्मीचे सुकृत फल हे जन्म हा भूवरी
या नरदेहास्तव धाडीलेस तू मातेच्या उदरी
गतजन्मीचे पाप नडे का मज या संसारी
तव चरणासी विन्मुख व्यर्थची जाती रात्रंदिन
काय करु कृष्णा आता व्यर्थची झाले जीवन
अनाथनाथा कमलाकांता आलो तवपदी शरण ॥१॥
माझे अंगी असून देवा मी पण अभिमान
निंदा दुजांची करुन मोजिले मी अवगुण
काळ वाया दवडून झालो किती हीन
कंप का रे सुटला पुढे यमदूत पाहून
काय करु कृष्णा आता व्यर्थची झाले जीवन
अनाथनाथा कमलाकांता आलो तवपदी शरण ॥२॥
कनककामिनी भोगामाजी गेलो गुंतून
पुन्हा मिळे का नरजन्म हा भरवसा कोठून
माझे माझे सगे सोयरे गेले मज सोडून
हरी तुजविण जगती दुजा दाता कोण
काय करु कृष्णा आता व्यर्थची झाले जीवन
अनाथनाथा कमलाकांता आलो तवपदी शरण ॥३॥
अवनीमाजी पुण्यक्षेत्रीची आस ही मजसी नाही
पवनात्मक गुरु मध्यमुनिंचे प्रवचन श्रवण ही नाही
अनन्यभावे गुरुसेवा ती कधीच केली नाही
वैष्णव असूनी नाही साधले देवा जनकल्याण
काय करु कृष्णा आता व्यर्थची जाले जीवन
अनाथनाथा कमलाकांता आलो तवपदी शरण ॥४॥
भागवतसंगे उपवास जागर तो ही घडला नाही
शुकमुनिवर्णीत हरीकथेचा योग ही आला नाही
भवभयास्तव नवविध भक्ती कधीच रुचली नाही
योगीवंद्य गोपाळ विठ्ठला आलो तवपदी शरण, शरण, शरण
काय करु कृष्णा आता व्यर्थची झाले जीवन
अनाथनाथा कमलाकांता आलो तवपदी शरण ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP