मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|पुरंदरायण|
शपथ मला रंगा

पुरंदरायण - शपथ मला रंगा

कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..


शपथ मला रंगा, रंगा तुला शपथ
रंगा तुला आणि मला भक्तांची शपथ ॥ध्रृ॥
तुजविण दूजा भजता, शपथ मला रंगा
हात माझा सोडलास तरी तुला शपथ
शपथ मला रंगा ....॥१॥
दुर्जनांचा संग केला शपथ मला रंगा
संग नाही तोडलास तरी तुला शपथ
शपथ मला रंगा ....॥२॥
काया वाचा वंचक होता शपथ मला रंगा
मन अस्थिर नाही केले स्थीर तुला शपथ
शपथ मला रंगा ....॥३॥
संतसंग नाही केला शपथ मला रंगा
साधुसंत सेवा नाही घडता तुला शपथ
शपथ मला रंगा .....॥४॥
देवा तुज अंतरता शपथ मला रंगा
पुरंदर विठ्ठला विसरता तुलास शपथ
शपथ मला रंगा ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : February 04, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP