पुरंदरायण - चिंता
कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..
अनुदिनी चिंता जीवासी
अनुदिनी चिंता ॥ध्रृ॥
भार्या असता चिंता
भार्या नसता चिंता
कुरुपी असता चिंता
रुपवती असता चिंता
अनुदिनी चिंता जीवासी
अनुदिनी चिंता ॥१॥
निपुत्रिक असता चिंता
धन नसताना चिंता
धन असोनीही चिंता
अनुदिनी चिंता जीवासी
अनुदिनी चिंता ॥२॥
धन राखण्याची चिंता
धन गेल्यावरी चिंता
बळ नसताना चिंता
बळ असोनिया चिंता
अनुदिनी चिंता जीवासी
अनुदिनी चिंता ३॥
उठता बैसता चिंता
जेवता झोपता चिंता
पुरंदर विठ्ठल नाम स्मरता
मिटेल अवघी चिंता
अनुदिनी चिंता जीवासी
अनुदिनी चिंता ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2023
TOP