पुरंदरायण - जिव्हा
कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..
जिव्हे तुज नाही, आचार विचार
नीच बुध्दि सोड, नको ग विखार ॥ध्रृ॥
तुज नाही हाड, किती विटाळिसी
नीच विचार, तू किती ग चळसी
निंदा दुजांची तू किती ग करिसी
जिव्हारी करिसी तू किती प्रहार
जिव्हे तुज नाही, आचार विचार ॥१॥
मूढ पापी जिव्हे, तुझे नीच कर्म
जिव्हे मनी जाण, साराच अधर्म
भला नरजन्म जाणूनी घे वर्म
जिव्हे तुझेपायी मोडिले संसार
जिव्हे तुज नाही, आचार विचार ॥२॥
नको ग चहाडी सदा रामनाम
नको कटुबोल वद कृष्ननाम
श्री पुरंदर विठ्ठल सत्य नाम
मुक्तीचे ते द्वार आनंद अपार
जिव्हे तुज नाही, आचार विचार ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2023
TOP