पुरंदरायण - मना का रे होसी उदास उदास
कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..
मना कारे होसी उदास उदास
मना घेई आता पांडुरंग ध्यास ॥ध्रृ॥
भला लाभला हा नरजन्म तुला
अज्ञान तिमिरी काळ घालविला
करी सार्थक तू नरजन्म भला
आडरानी या का वाट चुकलास
मना का रे होसी उदास उदास ॥१॥
हात पाय कान डोळे असताना
भार्यापुत्र सारे मोह तो जाईना
काम क्रोध लोभ हरी आठवेना
मायेचा संसार अवघा आभास
मना कारे होसी उदास उदास ॥२॥
घडीघडीने काळ व्यर्थ जाईल
यमदूत पाश घेवूनी येतील
थांब थांब म्हणता का थांबतील
मातीत मिळेल अखेरचा श्वास
मना का रे होसी उदास उदास
का रे झाल तुज, हरि विस्मरण
कर्ता करविता तोची नारायण
करी पुरंदर विठ्ठल स्मरण
हरिभेटी लागी जिवा लागो आस
मना कारे होसी उदास उदास ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2023
TOP